पावसात पूर्णपणे भिजत मंत्री अनिल पाटील यांनी भुमातेचे वंदन करत नारळ फोडत मानले आभार.

0

अमळनेर ( प्रतिनिधि) राज्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने अमळनेर येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भुमातेला नारळ फोडून वरुण राजाचे विशेष आभार मानले.
तब्बल महिन्याभरापासूनपाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती .शेतकरी राजासह सर्व धर्मियांकडून पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले होते .अश्यातच दोन तीन दिवसापासून जोरदार पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भूमातेला नारळ फोडून मानले देवाचे आभार.दरम्यान गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस पडावा म्हणून राज्यभरात सर्व धर्मीयांकडून कडून नमाज असेल प्रार्थना असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने साकडे घालण्यात आले होते.पाऊस यावा यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी श्रावण सोमवार निमित्ताने कपिलेश्वर महादेवाला निघालेल्या कावड यात्रेत सहभागी होत पावसासाठी साकडे घातले होते..देवाने प्रार्थना कबूल केल्याने ज्या भुमातेत मंत्री पदाची संधी मिळाली त्याच अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांनी भुमातेचे पूजन करून नारळ फोडून देवाचे आभार मानले आहेत.
भर पावसात कुठलाही आडोसा अथवा छत्री न घेता, मंत्री पाटील व त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, पावसात पूर्णपणे भिजत मंत्री अनिल पाटील यांनी भुमातेचे वंदन करत आभार मानले.

संकटात असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाल्याचा आनंद संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात का होईना या पावसामुळे दिलासा मिळणार असून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती त्यावरही काही प्रमाणात हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!