जरांगेंचे -पाटील उपोषण अखेर मागे
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच : मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे दिले आश्वासान..

24 प्राईम न्यूज 15 Sep 2023 मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जालना येथील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरगि- पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन समजूत काढली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे १७ दिवस सुरू असलेले उपोषण सोडले. मराठा समाजाला मुख्यमंत्री शिंदेच न्याय देऊ शकतात. मराठा समाजाला त्यांच्याकडूनच आता आशा आहे, मात्र मी भारावून न जाता आता मुख्यमंत्री शिंदेंच्या मागेच लागणार आहे. पुढच्या काळात आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.