फुटबॉल मध्ये अनुभूती, ताप्ती व नहाटा विजयी तर रुस्तमजी, सेंट मेरी व ललवाणी उपविजेते..

जळगाव ( प्रतिनिधी)
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय १७ वर्षा आतील मुले आणि मुली व १९ वर्षा आतील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या असून त्यात १७ वर्षा आतील मुलांच्या गटात अनुभूती इंटरनॅशनल स्कूल जळगाव ने सेंट मेरी अंमळनेरचा २-० ने पराभव केला.तर मुलींच्या गटात ताप्ती स्कूल भुसावळ ने रुस्तमजी स्कूल जळगाव चा १-० ने पराभव केला.
१९ वर्षातील गटात भुसावळ च्या नहाटा कनिष्ठ महाविद्यालयाने जामनेरच्या इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाचा २-० ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले.
पारितोषिक वितरण समारंभ
तिघी संघातील विजयी व उपविजेयी संघांना फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस च्या माध्यमाने चषक प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मावळते महापौर श्रीमती जय श्री महाजन, माजी जिल्हा सरकारी वकील तथा वकील संघटनेचे अध्यक्ष अडव्होकेट केतन ढाके व फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुख शेख हे होते.
यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे
१७ वर्ष -मुली
१. ग्रेस अकॅडमी चाळीसगाव वि.वि नाशिम हायस्कूल पारोळा
१-०
२. न्यू इंग्लिश एरंडोल वि.वि बुऱ्हानी पाचोरा
१-०
उपांत्य फेरी
३. ताप्ती पब्लिक भुसावल वि.वि ग्रेस अकॅडमी चाळीसगाव
३-०
४. रुस्तमजी जळगाव वि.वि न्यू इंग्लिश एरंडोल
२-०
अंतिम सामना
५. ताप्ती पब्लिक भुसावल वि.वि रुस्तमजी इंटरनॅशनल
२-०
१९ वयोगट मुली
१.इंद्राबाई लालवानी जामनेर वि.वि पी ओ नहाटा भुसावल
३-०
१७ मुले (उपांत्य फेरी)
९. अनुभूती जळगाव वि.वि लोर्ड गणेशा जामनेर
३-०
१०. सेंट मेरी अमळनेर वि.वि सेंट जोसेफ चाळीसगाव
१-०
अंतिम सामना
११. अनुभूती जळगाव वि.वि सेंट मेरी अमळनेर
२-०
फोटो कॅप्शन.