निंभोरा ग्रामपंचायत अभ्यास दौरा यशस्वी पणे उत्साहात संपन्न.

रावेर (शेख शरीफ)
रावेर तालुक्यातील निंभोरा : बु येथील ग्रामपंचायत सात दिवसीय अभ्यास दौरा दि.६/०९/२०२३. रोजी रवाना झाला व दि. १३ रोजी यशस्वी पणे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी निंभोरा ग्रामपंचायत १४ सभासदांचे चमूने पाटोदा, हिवरे बाजार व राळेगणसिद्धी अशा विविध ग्रामपंचायतींना भेटी दिल्या व वरील ग्रामपंचायतिच्या कामकाजाविषयी इतके इत्यभूत माहिती जाणून घेतली सुरुवातीला पाटोदा ग्रामपंचायतला भेटी देऊन पाणी केली त्यावेळी ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या मोफत प्राथमिक सोयी सुविधा यात वर्षभर दळण व डाळी व पापड उपक्रम,गरम पाणी, शुध्द पिण्याचे पाणी, डिजिटल, अंगणवाडी ,महिलांसाठी ठिकठिकाणी धोबीघाट, सर्व सुविधा वर्षभर मोफत दिल्या जातात व याचं संपूर्ण श्रेय हे एप्रिल महिन्यातच 100% कर वसुली होते. ज्यांनी कर नाही भरला अशांना ही सुविधा मिळत नाही.असं तेथील ग्रामसेवक पी .एस. पाटील यांनी सांगितले. सरपंच आणि माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून माहिती दिली.
त्यानंतर ग्रामविकासाची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या हिवरे बाजार ग्रामपंचायत गाठून सर्व विकसित स्थळांना भेट दिली पद्मश्री प्राप्त पोपटराव पवार यांच्याशी संवाद साधला व त्यांनी वृक्षारोपण, जलसंधारण विषयी मार्गदर्शन केले. गावाचा विकास सर्वस्वी शासनावर अवलंबून न राहता मुख्यतः गावकऱ्यांच्या सहकार्यानेच होतो. असे स्पष्टपणे ठासून सांगितले.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याबाबत चे मार्गदर्शन राळेगण सिद्धी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले व त्याचबरोबर नापास विद्यार्थ्यांना शिकवणारी शाळा व हिंद स्वराज्य संस्था व इतर ठिकाणी भेट दिली त्यांचे सहाय्यक नानासाहेब अवारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले अशा प्रकारे सदरचा अभ्यास दौरा खूप महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात असून सर्व ग्रामपंचायतीने अशाप्रकारे अभ्यास दौरा करावा असे आवाहन निंभोरा सरपंच सचिन महाले व सर्व ग्रामपंचायत सभासद आणि ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांनी सुचविले.