पुरच्या पाण्याने कापसाचे पीक भुईसपाट,नुकसान भरपाईची मागणी.

अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर तालुक्यातील नीम येथील शेतकरी
गंगाराम धनराज कोळी, बाबुराव शंकर कोळी, इंदुबाई धुडकू कोळी, धनसिंग नारायण कोळी यांचे
तापी नदी महापूर-हतनूर धरणाच्या सोडलेल्या पाण्याने प्रचंड नुकसान झालेले आहे.यात प्रामुख्याने कापूस पिकासह मका पिकाचे देखील प्रचंड मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे.पाडळसरे निम्न तापी प्रकल्पाच्या खालच्या बाजूला शेतकऱ्याचे नाव गंगाराम धनराज कोळी गट नंबर 54/1/A/3 राहणार निंब तालुका अमळनेर क्षेत्र 4 एकर झालेले नुकसान तीन लाखापर्यंत कापूस शेती पंप पाईप वाहून गेले आहे.
पूर आला की,दर वर्षी अशा प्रकारे नुकसान होत असल्याचे नुकसान ग्रस्तांनी सांगितले. तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नीम ता.अमळनेर येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.✍️