अजितदादा विरुद्ध रोहित पवार आमने-सामने

24 प्राईम न्यूज 19 Sep 2023
पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला अजित पवारांच्या हातून पुन्हा काबीज करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवारांनी आपला नातू आणि आमदार रोहित पवारांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार विरुद्ध रोहित पवार
या काकापुतण्यांमधला सामना पाहायला मिळू शकतो.

बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण या बालेकिल्ल्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची दादागिरी चालते. हाथ बालेकिल्ला पुन्हा एकदा शरद पवारांना काबीज करायचा आहे. यासाठी पवारांनी त्यांचा नातू आणि खास शिलेदार आमदार रोहित पवारांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरात काका अजित पवार विरुद्ध पुतणे रोहित पवार असा सामना पहायला मिळू शकतो.