चांदवडजवळील अपघातात धुळ्याचे चार जण ठार; मृतांत भाजप नगरसेवकाचा समावेश.

धुळे (प्रतिनिधि)आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावाजवळ कार-कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व मृत धुळ्यातील रहिवासी असून धुळ्यातील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांचाही मृतांत समावेश आहे. हा अपघात सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून नगरसेवक किरण अहिरराव हे मित्रांसह मुंबईहून धुळ्याकडे परतत होते. सकाळी सातच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कारची समोरून येणाऱ्या कंटेनरशी धडक झाली. यात कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला.