अमळनेर येथे पडळकरांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करत निषेध करण्यात आला.

अमळनेर (प्रतिनिधि) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. त्यांच्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक

झाले आहेत. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अमळनेर मध्ये उमटले आहेत. अजित पवार यांचे समर्थक, कार्यकर्ते ,महिला यानी महाराणा प्रताप चौक येथे जमत पडळकरांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला व महिला कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करत पडळकराच्या फोटोला पायांनी कुचलत राग व्यक्त केला या वेळी राष्ट्रवादीचे प्रा सुरेश पाटील , महेंद्र बोरसे , शहराध्यक्ष मुख्तार खाटीक , इम्रान खाटीक ,अनिल शिसोदे ,प्रा मंदाकिनी भामरे ,आशा चावरिया , अलका पवार ,कविता पवार , भागवत पाटील , बाळू पाटील ,सुनील शिंपी , पिंटू राजपूत , शुभम बोरसे , महेश पाटील , उमाकांत साळुंखे , देविदास देसले ,अभिषेक धमाळ हजर होते.