मुंगसे येथे शेतात विजेच्या धक्क्याने तरुणाचा ! मृत्यू.

मुंगसे, अमळनेर (प्रतिनिधि ) – येथील – ज्ञानेश्वर बापू कोळी वय – 33 यांचा सावखेडा रस्त्या वरील शेतात बैलांसाठी चारा गवत कापत असताना विजेचे धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी चोपडा येथे जाहीर केले !
याबाबत सविस्तर वृत्त असे की .मुंगसे सावखेडा रस्त्यावर हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात ज्ञानेश्वर बापू कोळी हा गुरांसाठी चारा कापत असताना आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान त्याला विजेचा धक्का लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने पुढील उपचारासाठी चोपड़ा नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले . त्यांचे अंत्ययात्रा रात्री पोष्टमांर्डम करून दि. २५ रोजी सोमवारी उद्या सकाळी ८ वाजता त्याच्या राहत्या घरून निघणार आहे .
त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ., चार बहीणी,, आई -वडील, व दोन काका असा परिवार आहे . ते माजी सरपंच बापू संपत कोळी यांचा मुलगा होत ! अपघाति निधन झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे .