जिल्हास्तरीय मनपा व्हॉलीबॉल मुलांच्या स्पर्धेत सेंट लॉरेन्स,आर आर व एम जे कॉलेज अंतिम विजेते.

जळगाव (प्रतिनिधि)
पासिंग वॉलीबॉल असोसिएशन व जळगाव शहर महानगरपालिका आयोजित आंतरशालेय व्हॉलीबॉल १४,१७ व १९ वर्ष मुलांच्या स्पर्धेत १४ वर्षे गटात सेंट लॉरेन्स, १७ वर्षे वयोगटात आर आर
विद्यालयाचा संघ तर १९ वयोगटात एम जे कॉलेज हे संघ अंतिम विजेते ठरले.

उपविजेते म्हणून न्यू इंग्लिश स्कूल, सरस्वती स्कूल व नूतन मराठा कॉलेज ठरले.
पारितोषिक वितरण
विजेते व उपविजेते संघांना पासिंग वॉलीबॉल असोसिएशन तर्फे चषक देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बार असो चे अडव्होकेट स्वप्नील पाटील,व्हॉलीबॉल च्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती अंजली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रीय पंच व संघटनेच्या उपाध्यक्ष श्रीमती मंजुषा भिडे, संचालक भाऊसाहेब पाटील यांची उपस्थिती होती.
स्पर्धेतील पंच
इफ्तेखार शेख, कुमारी कृपा बाविस्कर, कुमारी हिमांशी अहिरराव, कुमारी निकिता धांडे, दर्शन आटोळे,सोमेश आटोळे,हर्षद भोसले, भावेश शिंदे, जयंत साबळे, यश जंजाळे, चिरायू बागुल, उबेद खान, आवेश शेख, अक्षय सोनार, विष्णू वर्मा, राधेश्याम पाटील व अमजद पठाण यांनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल- १७ वर्षे मुले
१)आर आर विजय बाल विश्व
२)ओरियन स्टेट विजय सरस्वती
३)न्यू इंग्लिश विजय महाराणा प्रताप
४)सेंट लॉरेन्स विजय पोदार
५)न्यू इंग्लिश स्कूल विजय आर आर
६)सेंट लॉरेन्स विजय ओरियन स्टेट
७)सेंट लॉरेन्स विजय न्यू इंग्लिश स्कूल.
१४वर्षे मुले
१)लॉरेन्स विजय पोदार
२)बाल विश्व विजयी न्यू इंग्लिश
३)सरस्वती विजय महाराणा प्रताप
४)आर आर विजय मनपा उर्दू शाळा क्र ३५
५)अँग्लो उर्दू विजय सेंट लॉरेन्स
६)ओरियन स्टेट विजय बाल विश्व स्कूल
७)सरस्वती विजय अँग्लो
८)आर आर स्कूल विजय ओरियन स्टेट
९)आर आर विजय सरस्वती
१९ वर्ष मुले
१) एम जे कॉलेज विजय अँग्लो उर्दू
२) धनाजी नाना चौधरी विजय महाराणा प्रताप जळगाव
३) एम जे कॉलेज विजयी विरुद्ध नूतन मराठा कॉलेज
फोटो
१)१४ व १७ वयोगटातील विजयी संघासोबत खुर्चीवर बसलेले अडव्होकेट स्वप्नील पाटील, श्रीमती अंजली पाटील, मंजुषा भिडे, मजहर पठाण, फारुक शेख भाऊसाहेब पाटील, विजय रोकडे, रिना पाटील आदी दिसत आहे.
२) १९ वर्ष विजेता व उपविजेता संघ सोबत बसलेले अडव्होकेट स्वप्नील पाटील,अंजलीपाटील, मंजुषा भिडे, मजहर पठाण, फारुक शेख भाऊसाहेब पाटील, विजय रोकडे, रिना पाटील आदी दिसत