२५ वर्षा पासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखणाऱ्या ब्राह्मणे गावात पद्ग्रहन प्रसंगी आमदारांनी दिली भेट..

नूतन सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करून दाखवली विकासाची दिशा..
अमळनेर(प्रतिनिधी)
तालुक्यातील बाम्हणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा जगदीश पाटील तर उपसरपंचपदी विजय लोटन पाटील यांची बिनविरोध निवड करून बिनविरोध ची परंपरा कायम राखणाऱ्या या बाह्मणे गावास आमदार अनिल पाटील यांनी पद्ग्रहन सोहळ्याप्रसंगी सदिच्छा भेट देऊन हे गाव आता विकासाच्या दिशेने जात असल्याचे भाकीत व्यक्त केले.
आमदार अनिल पाटील यांनी बिनविरोध झालेले नूतन लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य सौ.वंदना किशोर पाटील, सौ.मनिषा रामचंद्र पाटील, सौ.शालु दिनकर पाटील, सौ.वैशाली जिजाबराव पाटील, राधेशाम राजाराम भिल यांचा विशेष सत्कार केला.ग्रामपंचायत कार्यालयात ही पद्ग्रहन सोहळा पार पडला. या वेळी उपसरपंच निवडीसाठी अमळनेर न.पा.चे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड हे निवडणूक निर्णय अधिकारी होते,त्यांना ग्रामसेवक अभिजीत देवरे सहाय्यक तर कर्मचारी म्हणून अधिकार पाटील यांनी सहकार्य केले.
बिनविरोध निवड झाली आता फक्त विकासाचे स्वप्न रंगवा असे आमदार अनिल पाटील यांनी सांगत आमदार निधीतील सभामंडप जागा जि.प शाळा वालकंपाऊंड कामाची पाहणी केली.तसेच नवीन पाणीपुरवठा योजना, पांझरा नदी संरक्षण भिंत, ग्रामपंचायत कार्यालय, शेत शिवार रस्ते, तलाठी कार्यालय, गावात काँक्रीटीकरण, स्मशानभूमी (बांधकाम, सुशोभिकरण, सात्वनओटा, वालकंपाऊंड) आदी मंजूरकाम सह उर्वरित कामांना लवकर मंजुरी देवून शुभारंभ केला जाईल असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी दिले.
दरम्यान बाह्मणे गावाने गेल्या 25 वर्षापासून एखादे अपवाद वगळता बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक देखील यंदा गावाने बिनविरोध करून युवा तरुण नेतृत्व गणेश भामरे यांना चेअरमन पदी बिनविरोध विराजमान केले आहे,त्याचवेळी आमदारांनी ग्रामस्थांचे कौतुक करून ग्रामपंचायत देखील बिनविरोध केल्यास पद्ग्रहन सोहळ्याला मी उपस्थिती देईन आणि विकासासाठी भरघोस निधीही देईल अशी ग्वाही दिली होती,ती शब्दपूर्ती आमदारांच्या या भेटीने झाली आहे.
यावेळी माजी सरपंच प्रविण ओंकार पाटील, बाम्हणे विकास सोसायटी चेअरमन गणेश भामरे, माजी सरपंच चंद्रकांत पोपट पाटील, यादव हरी सनेर, धर्मराज रावण पाटील, मा.चेअरमन धनराज गंभीर पाटील, प्रकाश राजाराम पाटील, हिरालाल बाबुराव पाटील, व्हाईस चेअरमन बारीकराव अंबर पाटील, जगदीश भगवान पाटील, भिकन बारिकराव पाटील, संतोष लक्ष्मण पाटील, राजेंद्र अभिमन पाटील, यशवंत पोपट पाटील, वसंत अभिमन पाटील, शांताबाई यशवंत पाटील, कलाबाई हिरालाल पाटील, युवराज नामदेव पाटील, नवल हिम्मत पाटील, देविदास दगा पाटील, रमेश विनायक पाटील, आधार बळीराम पाटील, दत्तात्रेय वामन पाटील, दिनेश पंडित पाटील, शशिकांत पाटील, सुनिल पाटील, ललित पाटील, संजय लोटन पाटील, सुनिल गुलाबराव पाटील, मोतीलाल बाजीराव पाटील, जिजाबराव पाटील, नितीन पाटील, दिनेश हिरालाल पाटील, किशोर हिम्मतराव पाटील, रविंद्र मिस्तरी, भैय्यासाहेब मन्साराम पाटील, वसंत पाटील, किशोर पाटील, अमृत पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पाटील, शरद पाटील, नितीन पाटील, रमेश पंडित पाटील, सुनिल पाटील, अमृत पाटील, दिनेश यशवंत पाटील, मधुकर पाटील, तुषार पाटील, कल्पेश पाटील, राजेश पाटील, कैलाश पाटील, प्रतीक पाटील, देविदास नेरकर, युवराज पाटील, जगदीश नाथबुवा, दुर्योधन नेरकर, विनोद पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळींचे अनमोल सहकार्य लाभले.
सदर निवडीचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, भाजपा नेत्या ऍड.ललिता पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील, मार्केटच्या मा.मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील, काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे सुभाष सुकलाल पाटील, कृऊबा माजी संचालक पराग पाटील, भाजपा चे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील तसेच धुळे शिवसेना (उबाठा गटाचे नेते) व महिंदळे चे सरपंच दिनेश पाटील यांनी अभिनंदन केले.