पर्यावरण पुरक संदेश देत एरंडोल न.पा.ने केला स्थानिक वार्ताहरांचा सन्मान..

0

एरंडोल(प्रतिनिधी) :- एरंडोल येथे आद्य मराठी पञकार तथा दर्पणकार पञकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या जन्मदिनी नगरपालिकेतर्फे स्थानिक पञकारांचा लेखणी,डायरी सह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी कापडी पिशवी देऊन सन्मान करण्यात आला.
नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे व ख्यातनाम प्रेणादायी वक्ते तथा किर्तनकार अविनाश भारती यांच्या हस्ते पञकारांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ.अजीत भट,सुञसंचालन विकास पंचबुध्दे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश सुकटे यांनी केले.

जहागिरपुरा तिळवण तेली समाज पंचमढी येथे देखिल शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन पञकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील होते.
यावेळी मराठी पञकारीतेचे जनक बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतीमेचे पुजन व दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक आनंदा चौधरी उर्फ भगत यांनी केले, सुञसंचालन तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष गुलाब चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.डी. चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता
गुलाब भिका चौधरी,रविंद्र चौधरी, प्रमोद चौधरी,आर.पी. चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,प्रमोद पाटील(जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष),वासुदेव पाटील(जिल्हाप्रमुख) डॉ.राजेंद्र चौधरी,भास्कर चौधरी(कासोदा),योगेश चौधरी(प्रहार दिव्यांग संघटना, कासोदा) अशोक चौधरी,तालुकाप्रमुख रविंद्र जाधव,बबलू पाटील,मयूर पाटील आदी मान्यवर तसेच बी.एस.चौधरी,शिवाजीराव अहीरराव,कैलास महाजन,शैलेश चौधरी,आबा महाजन,पंकज महाजन,प्रविण महाजन,उमेश महाजन,कुंदन ठाकूर,प्रमोद चौधरी,विकी खोकरे,चंद्रभान पाटील-निपाणे,देविदास सोनवणे,प्रल्हाद पाटील-आडगाव आदी पञकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!