*एरंडोल तालुक्यात अजुनही ३०टक्के शेतकरी पिकविमा लाभापासुन वंचित;शेतकर्यांमध्ये &प्रचंड संताप..

0

एरंडोल(प्रतिनिधी) तालुक्यात अजुनही २५ते ३०टक्के शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही म्हणून शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटाच्या दुहेरी चक्रात अडकलेल्या शेतकर्याला मदतीचा हात कधी मिळणार..? त्याच्या हक्काच्या विम्याची रक्कम मिळण्यास विलंब व दिरंगाई हेतुत: तर होत नाही ना? असे शंका वजा प्रश्न शेतकर्यांच्या गोटातुन विचारले जात आहेत.

एरंडोल तालुक्यात पिकविमा योजनेसाठी ७२६१ शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रार केली असता त्यापैकी ६१२२ इतके पाञ असुन ११३९ एवढे अपाञ ठरले आहेत तर ४८५१ शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला असुन आहे.१२७० शेतकरी अजुनही पिकविम्याची प्रतीक्षा करीत
आहेत अशी माहीती सुञांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!