अमळनेर तालुका कुस्तीगीर संघातर्फे 15 रोजी निवड चाचणी स्पर्धा..

अमळनेर/ प्रतिनिधि अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ संघातर्फे जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तालुका निवड चाचणी स्पर्धा दि 15 रोजी अमळनेर येथे होणार आहे.
अमळनेर प्रताप कॉलेज येथील इनङोअर हॉल येथे ही चाचणी स्पर्धा होणार आहे.यासाठी वजन गट पुढील प्रमाणे आहेत. गादी गट व माती गट 57की, 61कि, 65की, 70कि,74कि ,79कि,86 कि, 92 कि, 97कि, 125कि, दिनांक 15 रविवार रोजी सकाळी वजन 8 ते 10 या वेळेत होणार असून कुस्ती 10:30 वाजेपर्यंत सुरू होतील.अधिक माहितीसाठी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विश्वास संतोष पाटील (बाळू ),संजय कौतिक पाटील, हाजी शब्बीर पैलवान,प्रताप अशोक शिंपी, संजय पैलवान, रावसाहेब पाटील ,भरत पवार प्रवीण कुमार पाटील यांचेशी संपर्क साधावा. खेळाडुचे वय 18 वर्ष वरील असावे.तांत्रिक समिती मोबाईल नंबर 9970936510 व 9284349552 येताना
आधार कार्ड एक झेरॉक्स प्रत घेऊन यावी असे अमळनेर तालुका कुस्ती संघाने कळविले आहे.