गाढवाला पाण्याच्या टाकीवर चढवले कुणी-छगन भुजबळ.

24 प्राईम न्यूज 10 Dec

ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव, असे अप्रत्यक्ष आव्हान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी नाव न घेता मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना दिले. इंदापूरमध्ये आयोजित ओबीसी मेळाव्यात भुजबळ म्हणाले की, १९८५ मध्ये त्याचा जन्म झाला होता का? माहीत नाही त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो एक नाही तर दोन पदे भूषवली मी देशाच्या महापौरांचा अध्यक्षही झालो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखव.याच्या डोक्यात हवा गेली आहे. लोकांनी उगाच याला महत्त्व दिले आहे. गाढवाला पाण्याच्या टाकीवर चढवले कुणी, असा सवाल करीत भुजबळ यांनी मनोज जरांगे- पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.