स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे “भारतीय भाषा उत्सव” साजरा…..

अमळनेर /प्रतिनिधि

देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जात असून या निमित्ताने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस .ई.) येथे भारतीय भाषा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी काव्यात नवयुग निर्माण करणारे श्रेष्ठ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यावेळी पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी महाराष्ट्राती लावणी हा नृत्य प्रकार अगदी उत्कृष्टपणे सादर केले .त्यानंतर इयत्ता चौथीतील आराध्या दिसले या विद्यार्थिनीने संस्कृत मध्ये राम रक्षा स्तोत्र म्हटले तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी राजस्थानी वेशभूषा धारण करून अगदी आकर्षक असे नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी ,गुजराती ,पंजाबी अशा भारतातील विविध भाषांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांना एकतेचा संदेश दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी भारतीय भाषांची एकात्मता शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा सौहार्द निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण निर्मित झाले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना मातृभाषेसह जवळच्या दुसऱ्या भाषेविषयी आस्था निर्माण होऊ शकेल अन्य भारतीय भाषा शिकणे बोलणे हे आनंददायी झाली पाहिजे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्यातील स्पेशल डिशेस बनवून आणल्या होत्या त्यामुळे विविध राज्यातील खाण्यापिण्याच्या चालीरीतींची ओळख मुलांना देण्यात आली .शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी भारतीय भाषा उत्सव का साजरा केला जातो ? यामागील पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका नयना बोरसे व शुभांगी पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘राष्ट्रगीत’म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.