संसद भवनातील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललितला अटक..
आत्मसमर्पणानंतर ७ दिवसांची पोलीस कोठडी..

24 प्राईम न्यूज 16 Dec 2023

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड आणि या प्रकरणातील सहावा आरोपी ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याने महेश नावाच्या व्यक्तीसोबत दिल्लीच्या कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. त्याला शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घुसखोरीच्या प्रकरणानंतर दिल्लीतून पळालेल्या ललितने बसने थेट राजस्थानचे नागौर शहर गाठले होते. तेथे तो त्याच्या दोन मित्रांना भेटला आणि एका हॉटेलमध्ये रात्र काढली. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे लक्षात येताच तो मित्रासोबत बसने दिल्लीला परत आला. येथे त्याने आत्मसमर्पण केले. यानंतर त्याला पोलिसांच्या विशेष पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.