साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त रविवारी २४ रोजी अमळनेरात खास कार्यक्रम..

अमळनेर/प्रतिनिधि साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त मुले व पालकांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन दि.२४ डिसेंबर रोजी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.
साने गुरूजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष प्रारंभ झाले असून यानिमित्ताने लेखकाच्या मुलांशी गप्पा हा इयत्ता ६ वी ते ९ वी या वयोगटातील मुला मुर्लीसाठी महाराष्ट्रातील नामवंत बालसाहित्यिक मा. राजीव तांबे मुला- मुलीशी गप्पा करायला येणार आहेत. ही सुवर्ण संधी अमळनेर व खान्देशातील मुला मुलींना मिळेल याच वेळी पालक व शिक्षकांसाठी श्यामची आई या नवीन सिनेमातील अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखत असेल. रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक गलवाडे बु. परिसर गलवाडे शिंदखेडा रस्ता अमळनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
तसेच साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने सानेगुरुजी (१२५) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अश्या विविध क्षेत्रात प्रबोधनाचे १२५ कार्यक्रम विविध घटकांसाठी खान्देशासह महाराष्ट्रात वर्षभर राबविण्यात येणार आहे. याचे उद्घाटन कुटुंबातील सर्वांना आवडेल व महत्त्वपूर्ण कार्यक्रमाने, साने गुरुजी – कर्मभूमी स्मारकाच्या निसर्गरम्य परिसरात होणार आहे. याठिकाणी साने- गुरुजींची व लेखक यांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
या महत्वपूर्ण कार्यक्रमात पालक, शिक्षक, मुला मुलींनी सहभागी होऊन साक्षीदार व्हावे असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यांनी केले आहे. संपर्क संवादासाठी ९४२१७०२८४१, ९४२२७८४१९, ९४२२७९०६१०, ९०७५५७०५१० यावर संपर्क साधावा.