वृद्ध महिलेची ४३ हजार रुपये किमतीची २९ ग्राम सोन्याची पोत चोरूनअज्ञात चोरटा पसार..

अमळनेर (प्रतिनिधी) लग्नासाठी जाणाऱ्या चोपडा तालुक्यातील वृद्ध महिलेची ४३ हजार रुपये किमतीची २९ ग्राम सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १९ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास यावल ते धुळे बसमध्ये घडली. पैलाड ते बसस्थानक दरम्यान ही घटना घडली महिलांना आर्धे तिकीट झाल्या पासून गर्दीचा फायदा घेत बस मध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नाबाई सुरेश पाटील (रा. चुंचाळे ता. चोपडा) ही वृद्धा अमळनेर येथे लग्नासाठी येत असताना ही घटना घडली. महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.