डॉ.संभाजीराजे पाटील यांना “आरोग्यभुषण” पुरस्कार..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा येथील श्री साई हॉस्पिटल तथा डॉ संभाजी राजे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संभाजीराजे पाटील यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय “आरोग्यभुषण पुरस्कार ” प्रदान करण्यात आला.
श्री साई हॉस्पिटल व डॉ. संभाजीराजे पाटील फाउंडेशन मार्फत डॉ संभाजीराजे यांची परिसरात समाजहितासाठी अनेक उपक्रम तसेच गरजूंसाठी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान यासह वैद्यकीय सेवाकार्य सुरू आहे त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,कार्याध्यक्ष रोहित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नगर येथे आयोजीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात डॉ संभाजीराजे पाटील यांना राज्यस्तरीय “आरोग्यभुषण पुरस्कार “ प्रदान करण्यात आला.
सोहळ्यात डॉ.संभाजीराजे पाटील यांनी मनोगतात सांगितले की,दिलेला सन्मान हा जबाबदाऱ्या वाढवितो तसेच अधिक कामाची प्रेरणा देतो, यापुढेही अनेक उपक्रम नियोजित असुन समाजाची मोठी सेवा करण्याचा निर्धार आहे,सर्वांचे सदिच्छा प्रेम,सहकार्य कायम असल्यास डॉ संभाजीराजे पाटील फाउंडेशन चे कार्यक्षेत्र राज्यव्यापी स्तरावर लवकरच पोहोचेल असा विश्वास डॉ संभाजीराजे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
डॉ.संभाजीराजे यांचे कार्य थोडक्यात
तब्बल २ लाखावर रुग्ण तपासणी,अनेक योजनांचा लाभ मिळवून देत १५०० वर मोफत प्रसूती,कोरोना काळात रुग्णांवर वैद्यकीय सेवेची उल्लेखनीय कामगिरी,अभियानातून १५०० च्या वर मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत,८ हजाराचा वर मोफत नेत्रतपासणी,पूरग्रस्त गाव सहायता म्हणून वैद्यकीय सेवेसाठी गाव दत्तक योजना, परिसरात हॉस्पिटलमध्ये प्रथम रक्तपेढी सुविधा उपलब्ध तर शहरासह ग्रामीण भागात यात्रोत्सवात रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा मोफत..