मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही-जरांगे..

24 प्राईम न्यूज 28 Dec 2023
- छत्रपती संभाजीनगर । सरकारने आम्हाला मारहाण केली तरी आम्ही आता थांबणार नाही. मला गोळ्या घातल्या तरीही मी किंवा मराठा आंदोलक आता मागे हटणार नाहीत, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी दिला. मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयात त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आमच्या मुलांचे पुढील काळात खूप वाटोळे होणार आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला आरक्षण द्यायचे आहे. हीच आमच्या गोरगरीब मराठ्यांची भूमिका असून त्यावर आम्ही ठाम आहोत.आता शेवटचे सांगतो की, मुंग्यांसारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहेत. सरकारने मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही. आता मुंबईला गेल्याशिवाय माघार घेणार नाही. संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची माझी तयारी आहे. वेळप्रसंगी जीवदेखील द्यायची तयारी आहे, मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गोरगरीब मराठे मागे हटणार नाहीत, असेही जरांगे