तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू. -जरांगे- पाटील…

0

24 प्राईम न्यूज 30 Dec 2023. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मैदानाची पाहणी करण्यासाठी मराठा समाजातील काही पदाधिकारी शक्रवारी मंबईतील आझादमैदानाची पाहणी करून गेले. असे असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना थेट राज्यातील सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत राज्य सरकारला आंदोलकांच्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या न रोखण्याचे आवाहन केले आहे. . अडवण्याचा प्रयत्न करू नये

‘दिशा मुंबईची, ध्येय मराठा आरक्षणाचे’ अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे-पाटलांनी काहीही झाले तरी आपण मुंबईतील उपोषणासाठी जाणार, असे म्हटले आहे. अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने २० जानेवारी रोजी मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा निघणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटलांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठ्यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी दिली नाही, तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करू. जागा मिळेल तिथे आंदोलन करू. सरकारने आम्हाला अडविण्याचा प्रयत्न करू नये, असे जरांगे-पाटील थेट फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!