‘अजित पवारांसाठी प्रदेशाध्यक्षपद सोडायची तयारी होती..

24 प्राईम न्यूज 31 Dec 2023. अजित पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडायची तयारी होती. त्यासाठी पक्षाची बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याअगोदरच अजित पवार यांनी भाजपच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी ‘टु द पॉइंट’ या पॉडकास्टमधील दुसऱ्या भागात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. पक्ष विभागला जाऊ नये. त्यामुळे संकटे वाढतील अशी माझी धारणा होती. म्हणून मी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्या संपर्कात सुरुवातीला -महिनाभर होतो, पण त्याला यश आले नाही असे नमूद केले..