आघाडीत बिघाडी नाही! उद्धव ठाकरेंनची ग्वाही…

24 प्राईम न्यूज 31 Dec 2023
देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. कोणीही कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे जागावाटप सुरळीत होईल. माझ्याकडून आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिली. लोकसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची लवकरच एकत्र बैठक घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या जागावाटपावरून मविआत एकमत होत नसल्याची चर्चा आहे. अशातच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचा वाद रंगला आहे. या वादावर ठाकरे यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली.