नळपट्टी वसुली करिता दोन टक्के व्याजदराचा निर्णय रद्द करा . -मंत्री अनिल पाटील यांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना

अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथील नगरपरिषदेने 31 डिसेंबर 2023 नंतर नळपट्टी वसुली वर दरमहा दोन टक्के व्याजदर व त्यावर चक्रवाढ व्याज लावण्याचा निर्णय घेतला असल्याने तो तात्काळ रद्द करावा अश्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना केल्या आहेत.
सदर निर्णयाबाबत नागरिकांत रोष निर्माण होऊन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या,यामुळे मंत्री पाटील यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडून सदर निर्णयाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली तसेच सदर निर्णयामुळे दरवर्षी प्रामाणिकपणे 31 मार्च पर्यंत नियमित कर भरणाऱ्या नागरिकांनाच याचा भुर्दंड बसणार असून जे नागरिक अनेक वर्षे कराचा भरणाच करीत नाही त्यांना याचा काहीही पडणार नाही यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा तसेच यासंदर्भात शासन किंवा वरिष्ठ स्तरावरून काही परिपत्रक असल्यास वरिष्ठांशी आपण स्वतः बोलू मात्र नागरिकांना यातून सुटका द्या अश्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्याने मुख्याधिकारी सरोदे यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान मंत्री अनिल पाटील हे लवकरच बैठक घेऊन नगरपरिषदेच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.