जयंत पाटलांच्या प्रवेशामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला..

24 प्राईम न्यूज 1 Jan 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महायुती सरकारमध्ये येणार होते, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, असा रखडला, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी ३१ डिसेंबर रोजी केला. त्यांनी माध्यमांना सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. कारण जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत येणार होते. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. जयंत पाटीलच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादा अध्यक्ष शरद पवार यांना सांगणार होते. जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत, पण मनाने इकडे आहेत. जयंत पाटील आता आले नाहीत, मात्र ते आमच्यासोबत येतील. त्यांच्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. जयंत पाटील सरकारमध्ये प्रवेश करण्याबाबत झालेल्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या, असेही शिरसाट सांगायला विसरले नाहीत.