पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री
शिवसेना ठाकरे गटाचा संकल्प संजय राऊतांची माहिती..

24 प्राईम न्यूज 1 Jan 2023.

जागावाटपावरून आघाडीत महाविकास सुरू रस्सीखेच माजी असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नव्या वर्षात महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प केला आहे. नव्या वर्षात या महाराष्ट्रात शिवसेनेला पुन्हा एकदा शिखरावर न्यायचे आहे. शिवसेनेला नंबर एकचा पक्ष करायचा असून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा आहे. हा आमचा संकल्प असून ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार, असा निर्धार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच बोलून दाखवला. महाराष्ट्रात शिवसेनेला पुन्हा नंबर एकचा पक्ष करायचा आहे. या देशातील हुकूमशाहीचा नायनाट करायचा असून – हुकूमशाहीच्या छाताडावर लोकशाहीचा या झेंडा फडकवायचा आहे. तो आमचा संकल्प आहे, असे संजय राऊत यांनी प्रसार मध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.