ट्रकचालकांचा संप मागे

दिवसभर संपाची सर्वसामान्यांना धग: पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा
24 प्राईम न्यूज 3 Jan 2023 नवीन ‘हिट अॅण्ड रन’ कायद्यातील कठोर तरतुदीमुळे देशभरातील ट्रक व टँकरचालकांनी चक्काजाम केला होता. यामुळे देशाच्या विविध भागात इंधन व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. सरकारकडून याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर अखेर मंगळवारी रात्री ट्रक आणि टँकरचालकांचा संप मागे घेण्यात आला हिट अॅण्ड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रकचालकांच्या संघटनांनी संपाचे हत्यार उपसले होते. या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात मोठा फटका सहन करावा लागला. या संपामुळे मंगळवारी दिवसभर आणि सोमवारी संध्याकाळपासून अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही पेट्रोल पंपांमधील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला. त्यामुळे नागरिकांवर प्रचंड मनस्तापाची वेळ आली. या संपामुळे मंगळवारी सकाळी भाजीपाला प्रचंड महागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खूप अडचणीत सापडले होते.