मुलगी पहायला गेले अन् लग्न लाऊन आले… अमळनेर येथील गुफरान शहा व मनमाड येथील इसरार शहा परिवारातील लग्न ठरला आदर्श..

अमळनेर/प्रतिनिधि
अमळनेर येथील गुफरान शहा व त्यांचे परिवार मनमाड येथील इसरार शहा यांच्याकडे मुलगी पाहायला गेले होते मुलास मुलगी व मुलीस मुलगा पसंत आल्याने तसेच दोन्ही परिवार परिवारांचे विचार जोडल्याने लग्न जमवून घेण्याचे ठरले त्या वेळी शाह समाज मनमाड येथील माजी नगराध्यक्ष शाह समाजाचे जेष्ठ नेते कॉ रहेमान शाह सामाजिक कार्यकर्ते हाजी लूकमान शहा, अन्सार पहेलवान, अज्जू शेठ यांनी दोन्ही परिवारांना समजूत घालून इस्लाम मध्ये साध्या व सोप्या पद्धतीने लग्न लावण्याचे व त्याचे पुण्य किती आहे तसेच अनिष्ट प्रथा व रुढी त्यावर होणारा वायफळ खर्च या सर्वांच्या बाबतीत दोन्ही परिवारांची समजूत घातली व साध्या पद्धतीने मशिदीत निकाह लावून घेण्याचे प्रस्ताव ठेवले वधू पक्षाने व वर पक्षाने मान्यवरांच्या मागणीला मान देऊन लगेच निकाह लावून घेण्याचे प्रस्ताव मान्य केले अगदी साध्या व सोप्या पद्धतीने अंगावरील कपड्याने व कुठलेही आहेर न घेता मुलाकडील लोकांनी लग्न करून घेतले याप्रसंगी अमळनेर येथील शाह समाजाचे जेष्ठ कमर अली शहा असीफ अली शहा
येवला येथून मुलाचे आजोबा अश्फाक शाह, अजहर शहा, वाहिद शाह आदी सह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला गेला अतिशय अभिनव असा उपक्रम मनमाड व अमळनेर येथील शाह समाजाच्या वतीने घेतला गेला त्याचे सर्व समाजाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे