नामदार अनिल पाटील यांचा पाडळसरे धरण पाहाणी दौरा… -जनतेने नुसते कागद हलवणाऱ्या व नौटंकी करणाऱ्याच्या मागे जावू.. -मंत्री अनिल पाटील

←
अमळनेर/प्रतिनिधि मंत्री अनिल पाटील यांनी व कार्यकर्त्यांनी पाडळसरे येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की, धरणाच्या 15 प्रस्तंभाची उंची सहा मीटरने वाढली आहे. उर्वरित 8 प्रस्तंभांचे काम चालू आहे. 100 फूट उंचीपर्यंत काम होऊन त्यांनतर गेट बसवण्याची प्रक्रिया होईल. या कामाची मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी केली. ते पुढे म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यातील बुराई उपसा सिंचन योजनेला महिनाभरात मंजुरी मिळवेल. 2006 साली एक महात्म्याने टिपणी मारून ठेवली होती की, महापूर आला की धरणाचे गेट बंद असले तर ते वाहून जातील म्हणून संकल्प चित्र बदलवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र महापूर पावसाळ्यात येतो तेव्हा धरणाचे गेट उघडे असतात तर मग गेट कसे वाहतील असा सवाल करून त्याची टिप्पणी चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. एसएफसीची मान्यता घ्यावी लागेल. येणाऱ्या अर्थसंकल्पात 150 कोटीपर्यंत निधी मिळू शकतो. शेतापर्यंत पाणी कसे न्यायचे याचा सर्वे सुरु झाला आहे.मंत्रि पुढे बोलताना सांगितले कीजनतेने नुसते कागद हलवणाऱ्या व नौटंकी करणाऱ्याच्या मागे जावू नये. जो लोकप्रतिनिधी इमानदार असेल त्याच्या मागे रहावे. तसेच ज्यांना सुप्रमाचे महत्व माहित नाहीत असे निर्बुध्द माजी आमदार अमळनेरकरांनी मागील काळात निवडून दिले आहेत, अशी टीका नाव न घेता मंत्री अनिल पाटील यांनी केली.