धुळे औद्योगिक वसाहतीत विभागीय प्रशासकीय इमारत कामाचा शुभारंभ.. आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

धुळे/अनीस खाटीक
धुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधणे या कामासाठी दहा कोटी बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामाचा शुभारंभ आज आ.फारुख शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आला. धुळे औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात विकसित होत असून तसेच नरडाणा औद्योगिक वसाहत सुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होत आहे या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांना नाशिक व जळगाव येथे जावे लागत होते ही समस्या धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी आ.फारुख शाह यांच्याकडे मांडली त्यांच्या या निवेदनाचा विचार करता आ.फारुख शाह यांनी उद्योग मंत्री सावंत साहेब यांच्याकडे मागणी केली व याच्यासाठी दोन वर्ष पाठपुरावा केला या मागणीचा विचार करता उद्योग मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लक्ष रुपये मंजूर केले. या इमारतीमुळे धुळे जिल्ह्यातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणे प्रशासकीय कामासाठी सोयीचे होईल तशी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा या मोठ्या इमारतीमुळे प्रश्न प्रशासनाचे काम सुलभ होणार आहे. या भव्य इमारतीत उद्योजकांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून आता उद्योजकांना जळगाव नाशिक मुंबई येथे न जाता धुळे येथेच आपले काम मांडावे लागतील यामुळे उद्योजकांना होणारा त्रास वाचणार आहे .आज झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उद्योजक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी उपस्थित होते यावेळेस उद्योजकांनी आ.फारुख शाह यांचे आभार मानले व अपेक्षा केली की धुळे जिल्ह्यातील उद्योग वाढवण्यासाठी धुळे जिल्ह्यात एक सेमिनार घेण्यात यावा त्यामुळे उद्योजकांना चालना मिळेल व देशभरातील उद्योगपती आपले उद्योग लावण्यासाठी पुढे येतील.यापूर्वी आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नानेधुळे औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न देखील ३७ कोटी रुपयांची हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून निकाली काढला आहे.शुभारंभप्रसंगी आ.फारुख शाह यांचे सोबत भिखनहाजी शाह, डॉ. दिपश्री नाईक,निजाम सैय्यद,इकबाल शाह,डॉ.बापुराव पवार,आसिफ शाह,हारूण खाटीक, सउद आलम,सलमान खान,रियाज शाह,समीर शाह,फैसल अन्सारी,आदी उपस्थित होते.