हिंदुत्ववादी संघटनेने काढली आ. आव्हाड यांची प्रतिकात्मक अंत्य यात्रा..

अमळनेर/ प्रतिनिधि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम बद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अंत्य यात्रा काढून पुतळा दहन केला सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदूवादी संघटनांनी तिरंगा चौकातून अंत्य यात्रा काढली यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मोठी घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर पुतळा दहन करण्यात आले तर संजय शहा यांनी आव्हानांचे वक्तव्य हे निंदनीय आहे प्रभू रामाबद्दल केलेले अक्षम्य विधान खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले या वेळी मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते..