राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे प्रकरण वेगळे-प्रफुल्ल पटेल..

24 प्राईम न्यूज 13 Jan 2023
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकाली काढल्यापासून सर्वांचे लक्ष लागले आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीकडे. या प्रकरणात अजितदादा गटाचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रकरण वेगळे असल्याचे सांगितले.
शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे यासंबंधीचे सर्वाधिकार हे विधानसभा अध्यक्षांचेच असल्याचे एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयानेदेखील मान्य केले आहे. आमदार अपात्रता प्रकरण ही एक न्यायिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.