मोदींनी सखाराम महाराजांशी संवाद साधत घेतले आशीर्वाद..

अमळनेर/प्रतिनिधि

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी या दिवशी येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभु श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात विधीवत् पूजा आणि आरती करण्यात आली. या वेळी श्री काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्वस्त यांच्या वतीने मोदी यांचा प्रभु श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘सियावर रामचंद्र की जय’ घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला या वेळी संत सखाराम महाराज अमळनेरकर(प्रसाद महाराज) यांच्याशी संवाद साधत आशीर्वाद घेतले या वेळी काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त सर्वश्री धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी, तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.