सांगवीत सेवानंदजी महाराज जयंती साजरी ; विविध कार्यक्रमांचे आयोजन..

प्रकाश पाटील/पारोळा प्रतिनिधी
पारोळा – सांगवी (ता.पारोळा) येथे श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान गुरू श्री सेवानंदजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी गुरु श्री सेवानंदजी महाराज यांच्या समाधी अभिषेक करण्यात आला,अभिषेकसाठी ३५ विविध तीर्थक्षेत्रावरून पवित्र तीर्थजल आण्यण्यात आले होते.
सायंकाळी गावात श्री सेवानंदजी महाराज पालखी व तीर्थजल कलश यात्राची मिरवणूक काढण्यात आली.अनेक महिला भगिनींनी पालखीची पुजा करून दर्शन घेतले.दरबाराचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. भंडारा महाप्रसादासह भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता,याचा भाविक भक्तांनी आनंद घेतला.
यावेळी विश्वस्त सदस्य छोटु बडगुजर,फकिरा ऊर्फ सपनानंद खोकरे,अविनाश जडे,बन्सी देवरे, ॲड किशोर पाटील,सुनिल वारुळे,संजय फिरखे,राजेंद्र पाटील,रमेश चौधरी,अनिल तांबटकर,पिन्टु जागळे,भगवान पाटील,रमेश वाघ,बंडु मिस्तरी, विक्की खोकरे आदी भक्तगण, ग्रामस्थ उपस्थित होते.