मुलांच्या चुका न शोधता त्यांचा पाठीवर कौतुकाची थाप द्या —देविदास कोळी .                             -गेट टुगेदर च्या माध्यमातूम 33 वर्षानंतर शारदीयन आले एकत्र ..

0


अमळनेर/ प्रतिनिधि
परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि बिघडवत नाही त्या परिस्थितीवर मात करायला शिका. यात पोरांच्या चुका न शोधता त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या. असे प्रतिपादन 86 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक देविदास कोळी यांनी कळमसरे ता. अमळनेर येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या सन 1991 च्या विध्याथ्यांच्या गेट टुगेदर कार्यक्रमाप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला 33 वर्षानंतर सर्व शारदीयन मित्रमैत्रिणी एकत्र आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी आर चौधरी हे होते.
सर्वप्रथम सर्व मित्र व मैत्रीनींनी शाळेत जात जुन्या आठवणीना उजाळा देत वर्गातील बाकावर लहानपणीच्या गमती जमतीना उजाळा दिला.
यावेळी माजी विद्यार्थी व सुरत महानगर पालिकेचे नगरसेवक सुधाकर चौधरी यांनी सर्व शिक्षक व मित्रांना अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट दिली.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक जे. वाय.कुंभार, व्ही. एन. न्हावी, ए.ई. सोनवणे, आर. डी. पाटील, ए. एन. महाजन, एस. बी. महाजन, एच. बी.भोई, व्ही. टी. इंगळे, डी. डी. राजपूत, व्ही. एस. चौधरी, आर. डी. चौधरी, आर. आय. सूर्यवंशी, श्रीमती एन. ए. चौधरी, डी. जी. टाक,धर्मा सैंदाणे, नारायण तमखाने,गंगाराम पवार, मधुकर पाटील अशोक चौधरी यांची उपस्थिती होती.
यावेळी मयत शिक्षक, व वर्ग मित्र यांना श्रद्धांजली देत आठवनीने सर्व मित्रांचे डोळे पाणावले होते.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थीनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार सर्व मित्रांनी केला. यात सुधाकर चौधरी, बाबुलाल पाटील, अनिल बेदमूथा, संजय महाजन यांचा सत्कार झाला.
याप्रसंगी संजय महाजन, सोमनाथ चौधरी, अनिल बेदमूथा, संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व मित्र मैत्रिणीनी दुपारी येत गीत गायन, चारोळी, व लहानपणीच्या आठवणीनी रममान झाले. यावेळी ज्ञानेश्वर महाजन, राजेंद्र चौधरी, गोपाल बडगुजर, विकास चौधरी, अशोक सोनवणे, गणेश धनगर, काशिनाथ सोनवणे, अनिल राणे, जगदीश कुंभार,ज्ञानेश्वर महाजन, अनिल चौधरी, भिका पाटील, राजेंद्र बडगुजर, पारसनाथ चौधरी, विकास महाजन, निंबा चौधरी, सुनील चौधरी, अविनाश गहिवरे, हेमंत पाटील, संदीप पाटील, रमेश पाटील, लोटन पाटील, संगीता महाजन, नीता महाजन, नंदलाल महाजन, भगवान पाटील, पंडित पाटील, प्रकाश महाजन, संजय चौधरी, किशोर मिस्तरी, पितांबर महाजन, मधुकर चौधरी, संजय रामकोर,ज्ञानेश्वर मोरे, चंद्रभान पाटील, रविंद्र पाटील, संजय मिस्तरी, शांताराम कोळी,अधिकार चौधरी, आदी मित्र यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चौधरी, भूपेंद्र महाजन तर आभार प्रदर्शन महेमूदखा पठाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!