लोकमान्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा..

0

अमळनेर/प्रतिनिधि येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात सालाबादाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच पारितोषिक वितरणही करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला पहिल्या पुष्पात अध्यक्ष राजेंद्रजी सच्चिदानंद खाडिलकर हे होते. तर प्रमुख पाहुणे रवींद्र रामचंद्र कवीश्वर व सौ. सुनंदा रवींद्र कवीश्वर आणि माजी विद्यार्थी लोकनियुक्त सरपंच मडगव्हाण तारकेश्वर पांडुरंग गांगुर्डे व त्यांच्या सौभाग्यवती स्वाती तारकेश्वर गांगुर्डे हे होते.
तर दुसऱ्या पुष्पात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.रमेश रामचंद्र बहुगुणे तर प्रमुख पाहुणे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. राजेशजी बाबूलाल पांडे व नॅशनल युवा को-ऑप सोसायटी पुणेचे डायरेक्टर सौ.सरोज राजेश पांडे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा.श्री.दिलीपदादा पाटील यांनी विशेष उपस्थिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पारितोषिक वितरण केले. यावेळी लोकमान्य विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मनोहर भगवान महाजन यांनी अहवाल वाचन केले तर ज्येष्ठ शिक्षिका मनीषा खांजोडकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंदजी भांडारकर तसेच चेअरमन लोकमान्य विद्यालय प्रा.डॉ.प्रभाकर जगन्नाथ जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सौ.सायली देशपांडे, आशा सोनवणे, विजय सूर्यवंशी, संदीप महाजन यांनी सूत्रसंचालन केले. तर भूषण महाले व माधुरी सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!