टायगर स्कूल येथे संक्रांत निमित्त विविध स्पर्धा..

प्रकाश पाटील/पारोळा प्रतिनिधी
पारोळा – टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे मकर संक्रांत उत्साहात साजरा करून त्यानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्ले ग्रुप,नर्सरी च्या विद्यार्थ्यांसाठी काईट कलरिंग ऍक्टिव्हिटी, ज्युनिअर केजी च्या काईट डेकोरेशन,सिनियर के जी च्या संक्रांत स्पेशल स्पीच कॉम्पिटिशन,फर्स्ट,सेकंड स्टॅंडर्ड च्या विद्यार्थ्यांसाठी काईट मेकिंग स्पर्धा घेण्यात आली तसेच तिळापासून वस्तू बनवणे जसे की बाहुली,तिळाचा पतंग,घरगुती वस्तूसह अनेक प्रकार च्या वस्तू बनवून प्रदर्शित करण्यात आल्या. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.स्पर्धा निरीक्षक म्हणून स्कूलचे प्राचार्य अजीम शेख व उपप्राचार्या कविता सूर्यवंशी यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांना मकरसंक्रांत विषयी माहिती देण्यात आली.यावेळी स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील यांचेसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.