विवाहितेचा छळ ; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रकाश पाटील/पारोळा प्रतिनिधी
माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन ये म्हणुन मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत विवाहितेने पारोळा पोलिसात फिर्याद दिली की, दळवेल येथील माहेर व हवालदार चाळ पावणे गाव,बेलापूर ठाणे येथील सासर आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये पती दीपक वसंत सोनवणे यांचाशी माझा विवाह झाला असुन ते खाजगी कंपनीत कामाला आहेत,सुरवातीचे दोनच महिने मला चांगली वागणूक दिली त्यानंतर पती दारू पिऊन मारहाण करत होते तसेच लग्नात हुंडा कमी दिला,मूळ दिले नाही म्हणून मूळ घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन ये म्हणून पती व सासू उषाबाई सोनवणे यांनी मानसिक व शारीरिक त्रास देऊन वेळोवेळी छळ केला,याबाबत वरील दोघांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.