पारोळा येथून मोटरसायकल चोरी.

प्रकाश पाटील/पारोळा प्रतिनिधी
पारोळा शहरातील लालबाग परिसरातून पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत समाधान लोटन पवार यांनी फिर्याद दिली की,दि.११ रोजी रात्री दहा ते १२ रोजी पहाटे चारच्या दरम्यान एचएफ डीलक्स मोटर सायकल क्रमांक १९ डी एच ४८५७ ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या अंगणातून चोरून नेली आहे,याबाबत पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.