मिलिंद देवरांनी काँग्रेसचा हात सोडून हाती घेतले धनुष्यबाण..

24 प्राईम न्यूज 15 Jan 2023. लोकसभेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माजी खासदार आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला. काँग्रेसने नुकतीच देवरा यांची राष्ट्रीय सह खजिनदार म्हणून नियुक्ती केली होती. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्यापासून मिलिंद देवरा नाराज होते. या पार्श्वभूमीवर देवरा यांनी रविवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्यासोबत काँग्रेसचे १० माजी नगरसेवक तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला..