मातोश्रीबाहेर बॉम्बस्फोटाची धमकी अफवेच्या फोननंतर निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ…

24 प्राईम न्यूज 16 Jan 2023. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे पूर्वच्या कलानगरमधील मातोश्री निवासस्थानाबाहेर बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा एक फोन कॉल सोमवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. सोबतच तामिळनाडू पोलिसांच्या नियंत्रण कक्षालादेखील मुंबईत. बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आला. चौकशीनंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तरी मुंबई पोलिसांनी मातोश्री निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संवेदनशील ठिकाणची गस्त वाढवली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणारी व्यक्ती मुंबई-गुजरात एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. याच ट्रेनमधून ४ ते ५ मुस्लीम तरुण उर्दूतून दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडवर भाड्याने घर घेऊन राहण्याविषयी चर्चा करत होते. त्यांचे संभाषण ऐकल्यानंतर हा फोन केल्याचे अज्ञात
व्यक्तीने म्हटले होते.