अजितदादांच्या गटातील नेते भाजपच्या संपर्कात -रोहित पवार…

24 प्राईम न्यूज 16 Jan 2023. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी काही नेत्यांची यादीच जाहीर केली.
यामध्ये त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही, मात्र काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये येणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे वक्तव्य केले. शरद पवार गटातील सहा ते सात मोठे नेते अजित पवारांच्या गटात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर आमदार रोहित पवारांनी प्रतिदावा केला असून, ते म्हणाले की, अजित पवार गटाचेच काही नेते भाजपच्या संपर्कात आहेतच, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे नेते राहतील का? हे पाहावे लागणार आहे. त्यांच्यातील बहुतांश लोकांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल, असाही टोला आमदार रोहित पवारांनी यावेळी लगावला