दगडफेक करणाऱ्या जमावावर दंगलीचा गुन्हा..

शिरपूर/प्रतिनिधि
दुचाकीमधील पेट्रोल काढल्याचा संशय आल्याने त्याचा जाब विचारणाऱ्या तरूणावर ३० ते ४० जणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत दोघे गंभीर जखमी झाले. रविंद्र बाबुलाल बडगुजर, रा. कुंभारटेक, ता. शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरासमोरील मदिना मोहल्ला परिसरात एम.एच.१८/ए. एच.४७३० क्रमांकाच्या दुचाकीमधील पेट्रोल कोणी काढले, असे नविद खलील शेख यास विचारले असता राग आलेल्या तोसिफ खलील शेख याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी शेजारी उभे असलेले आकीब जावेद शेख, बाबा गुलाब मन्सुरी, अबुझर शाहिद शेख, दानिश तमिच बागवान, नदिम सलीम शेख, मुस्तकी शेख, – शाहीद शेख, सईद सलीम पिंजारी, सादिक सलीम पिंजारी, सलमान सलीम पिंजारी, सादीक शेख ऊर्फ काल्या, अजहर शेख, आकीब जावेद शेख, नविद खलील शेख, ऐजेशाम मुजाहीद शेख, इमरान युसूफ शेख, साहिल आदिल सैय्यद सर्व रा. मदिना मोहल्ला, शिरपूर व इतर १५ ते २० जणांनी दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने दगडफेक केली. यात दोघे जखमी झाले. या किसन फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ३० ते ४० जणांवर हेल्थ दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गणेश तपास पोउनि संदीप दरवडे करीत आहेत..