सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने संक्रात केली गोड…. – -कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना
सुमारे सव्वा कोटी रुपयाचे वाटप…

अमळनेर/प्रतिनिधि. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाटप केले सव्वा कोटी अमळनेर नगरपरिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांनी सन २०१८ पासून सेवानिवृत्त सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात सेवा उपदानाच्या रकमा प्रलंबित होत्या त्या बाबत सेवानिवृत्त कर्मचारी तथा कामगार संघटनाच्या सारख्या तक्रारी सतत सुरु असायच्या व सरोदे साहेबांना देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल बघवत नव्हते. त्यामुळे साहेबांनी सुमारे ४/५ वर्षांपासूनच्या ८९ सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना उपदानाच्या सुमारे सव्वा कोटी रुपयाचे वाटप करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने संक्रात गोड करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुखद दिलासा दिल्याबद्दल अमळनेर नगरपरिषदेतील कर्मचारी संघटनाचे श्री. अनिल बेंडवाल, किशोर संगेले, सोमचंद संदानशिव, प्रसाद शर्मा, अविनाश संदानशिव, ऍड. शकील काझी यांनी साहेबांचे विशेष आभार मानून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संक्रांतीची एक रक्कमी सव्वाकोटीचे वाटप केल्याबद्दल अभिनंदन देखील केले आहे. या कामी मुख्याधिकारी साहेबांना लेखापाल श्री. चेतन गडकर, लिपिक श्री.जगदीश ठाकरे, कमलेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले..