महसूल पथकावर हल्ला प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा.. -पारोळ्यात सामाजिक संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

प्रकाश पाटील/पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील उत्राण येथे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचासह महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला,या घटनेच्या निषेधार्थ दि.१६ रोजी पारोळा येथे विविध सामाजिक संघटनेतर्फे पारोळा पोलिस स्टेशनला निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह महसूल विभागाचा अधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला. हल्ल्यात उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.सदर घटना अतिशय निंदनीय असून अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायदेचा धाक राहिलेला नाही. न्यायदंडाधिकारी सुरक्षित नाहीत तर सामान्य जनतेचे सुरक्षितेचे काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.म्हणुन या घटनेचा निषेध व्यक्त करत पारोळा तालुक्यातील भिम आर्मी सामाजिक संघटना,सद्गुरू महिला उद्योग,बंजारा समाज सेवा संघ,पंचशील मित्र मंडळ पारोळा तर्फे निषेध व्यक्त करत घटनेतील दोषी आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करावी यासाठी पारोळा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार संदिप सातपुते यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जितेंद्र वानखेडे,सचिन खेडकर,दादाभाऊ खैरनार, कमलेश सोनवणे,सुवर्णा पाटील, ॲड.स्वाती शिंदे,अर्चना पाटील, पवार मॅडम आदी उपस्थित होते.