सदा जनसेवा फाऊंडेशनतर्फे
हजरत मोईनोद्दीन चिश्ती यांच्या ऊर्स..
छठ्ठी शरीफनिमित्त मिठाई व खीर वाटप..

नंदुरबार/प्रतिनिधि. येथील सदा जनसेवा फाऊंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही हजरत मोईनोद्दीन चिश्ती उर्फ ख्वाजा गरीब नवाज (हिंद के राजा) यांच्या ८१२ व्या ऊर्स छठ्ठी शरीफ निमित्त शहीद टिपु सुलतान बागवान गल्ली येथे मिठाई व खीर वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते इसामु ठेकेदार, सलील शेख, अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्यु.कॉलेजचे संचालक सईद इब्राहीम बागवान, हाजी रशीद खाटीक, शिवसेना शहर प्रमुख छन्नू पठाण, सामाजिक कार्यकर्ते शौकत धोबी, बाला शेख, वसीम धोबी, शेख इब्रास शेख इसामु, लाला बागवान, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हजरत मोईनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गा मजार तैल चित्राला (फोटो) पुर्ष्पापण तसेच लोभानचे धूप देण्यात आली. यावेळी प्रार्थना करतांना देशात शांती, भाईचारा, राष्ट्रीय एकात्मता रहावी, अशी मनोकामना करण्यात आली. यावेळी एजाज बागवान म्हणाले की, हजरत मोईनोद्दीन चिश्ती हे सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहेत. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मिठाई व खीरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब बागवान यांनी केले. तर आभार शेख सलिम ठेकेदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहील बागवान, शोएब मनियार, गोलू सिकलीकर, तैफ शेख, शकील बागवान आदींनी परिश्रम घेतले.