आता २३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण

- राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती
- ३१ जानेवारीपर्यंत चालणार काम
24 प्राईम न्यूज 19Jan 2023. आता २३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती ३१ जानेवारीपर्यंत चालणार काम मनोज जरांगे-पाटील यांच्या आक्रमक आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकारची धावाधाव सुरू झाली असून, कुणबी प्रमाणपत्राचे तातडीने वाटप करावे, असा आदेश देतानाच राज्यातील मराठा सर्वेक्षणाच्या हालचालीही वेगात सुरू झाल्या आहेत, त्यानुसार आता १३ जानेवारीपासून राज्यात मराठा सर्वेक्षण सुरू होणार आहे. या सर्वेक्षणासाठी २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालये आणि महानगरपालिकांत खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर वार्ड आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल आणि मग सर्वेक्षण सुरू करण्यात येईल. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत संपविण्यात यावे, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारने
जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी २०जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला
आहे. त्यासाठी अवघे दोन दिवसच उरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढल्याने तातडीने निर्णय घेण्यात आले आहेत. या अगोदर राज्यात सापडलेल्या कुणबी नोंदीनुसार तत्काळ ५४ लाख कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. त्यानंतर आता राज्यात मराठा सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हे सर्वेक्षण महसूल विभागांतर्गत केले जाणार आहे. या सर्वेक्षणाची सुरुवात २३ जानेवारीपासून होणार असून, हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी दोन दिवस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे