इथं दिसंना, तिथं दिसंना… राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादांना चिमटा..

24 प्राईम न्यूज 19Jan 2023. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असल्याच्या घोषणा त्यांच्या समर्थक आमदारांसह कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत तसे बॅनरही ठिकठिकाणी झळकले आहेत तर, आज, गुरुवारी झालेल्या एका मेळाव्यात भावी मुख्यमंत्री अजित पवार असल्याचे म्हटले गेले यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट करत अजित पवार यांना कोपरखळी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांच्यासह आमदारांचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झाला शिवसेनेप्रमाणेच त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह याच्यावर दावा केला आहे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला काढत अजितदादा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली होती याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून देखील वारंवार हाच दावा केला जात आहे. याशिवाय, अजित पवार यांचे ठिकठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागत आहेत या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या महिला आघाडीतर्फे मुंबईत ‘निर्धार नारी शक्तीचा’ मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करताना त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी भूमिका मांडली. मेळाव्याला उपस्थित प्रत्येक महिलेला टोपी देखील देण्यात आली होती. या टोपीवर ‘एकच वादा भावी, मुख्यमंत्री अजितदादा’ लिहिले होते.यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांची खिल्ली उडवली आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार गर्दीत कोणाला शोधताना दिसत आहेत आणि बॅकग्राऊंडला ‘पिंजरा’ चित्रपटातील ‘इथं दिसेना, तिथं दिसेना…’ हे गाणे ऐकायला मिळते. ‘भावी मुख्यमंत्री’ समोरच्या गर्दीत भविष्यातील मुख्यमंत्रीपदाची आशा शोधताना दिसत आहेत, जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते विरोधकांच्या बगलेत बसून भविष्याचे स्वप्न पाहत आहेत. तीच बगल घट्ट करत कधी सरकार तुमचाच घात करेल, सांगता यायचे नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमचीच कारकीर्द आंबट करण्याआधी सावध व्हा, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.