राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग एरंडोल आगाराचा इंधन बचत मासिक कार्यक्रम संपन्न..

एरंडोल/कुंदन सिंह ठाकूर राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग एरंडोल आगाराचा इंधन बचत मासिक कार्यक्रम सन २०२४ दि १६/0१/२४ ते १५/0२/२४ चे उदघाटन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष डॉ.श्री सुरेश पाटील व सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जगदीशभाऊ ठाकूर यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी प्रभारी आगार व्यवस्थापक श्रीमती भारती बागले होत्या यावेळी व्यासपीठावर वाहतूक निरीक्षक श्रीमती.योगिता बराटे आगार लेखाकार श्री. ईश्वर चौधरी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर व मार्गदर्शक जगदीश ठाकूर व डॉ सुरेश पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक वाहक किशोर मोराणकर यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातुन उपस्थित चालक वाहकाना इंधन बचतीचे विविध मुद्दे सांगून अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करून एस टी सेवेचे कौतुक केले व सुरक्षित पणे वाहन चालविण्याचे आवाहन केले यावेळी आगारातील उत्कृष्ट कॅपिटल आणणाऱ्या 10 चालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यानंतर प्रभारी आगारप्रमुख भारती बागले यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करून इंधन बचतीचे महत्व स्पष्ट केले आभार प्रदर्शन सतीश महाजन यांनी केले.